Thursday 18 February 2016

मुक्ताफळ -अननस

तुझ्या विशुद्ध प्रेमाच्या आंचेत जळून जाऊ देत कमतरता, सांग प्रिये स्वतःशीच कसं लढू?

साने गुरुजींच्या पुस्तकांना हल्ली वाळवी, कसर सुद्धा तोंड लावत नाही. पचायला जड आहेत म्हणून.


क्लासमध्ये एक मुलगा आहे ज्याच्या अंगाला भयंकर घाण वास येतो,माझी सर्दी कमी होत चालली आहे. बापरे! देवा या कस्तुरीमृगाला आंघोळ करायची बुद्धी दे


फसवे सोनेरी पाश तोडावे, पतंगाप्रमाणे उंच उंच जावे
एवढे फैलावावे की, प्रियजनांचे अवकाश व्हावे.


अरे,फलाण्याआजोबांच्या पाया पड,त्यांच्या वयाचा मान राख.

मोठं वय हाच मान मिळवण्याचा निकष असेल तर आलोच, गार्गीने पाळलेलं कासव 116 वर्षांचं आहे


गुप्तता नं पाळता येणाऱ्या माणसाने डायरी लिहू नये कधी, भलत्याच्या हाताला लागायची भिती असते.


जी.ए. पुस्तकांतून खोकले. माझ्या  दुबळ्या मनाला चटकन जंतूंनी धरलं. चांगलेच फोफावले. आता माझा आजार हीच माझी ओळख बनली आहे. प्रिये तू दूरच रहा.



सुखी माणसाचा सदरा नको, एखादा धागा फक्त मिळाला तरी त्याला लटकून राहीन मी..

No comments:

Post a Comment