डोक्यावरचा सूर्य कातडी जाळत होता..
घामाचा खारटपणा डोळ्यांच्या कडांना जाणवला, अश्रूही निर्लज्जपणे घामाच्या धारेत मिसळून गालफाडावरचा थेंब वाढवत होते..
डोहाच्या कडेवरून तिने एक धोंडा लाथाडला, तो कसातरीच लडबडत पाण्यात पडला.
काठावरचं दगडच वाटलेलं कासव पटकन डोहात लुप्त झालं..
तिला उगीचच स्वतःचं प्रतिबिंब पाहावंसं वाटलं..
खोल डोहातलं शेवाळी पाणी तिची शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण करायला तयार नव्हतं.
"कालसर्पाच्या जबड्यातल्या उंदराला कोण विचारतंय शेवटची इच्छा?"
मगाचच्या आवाजपेक्षा कितीतरी मोठा आवाज झाला..
लाटांच्या भाकऱ्याही मोठ्या उमटल्या..
या घटनेचा साक्षीदार कावळा वडाच्या फांदीवरून कितीतरी वेळ कर्कश्य किंचाळत राहिला..
वड मात्र सारं काही केव्हाच समजल्यासारखा डोहाकाठी पाय सोडून ध्यानस्थ, लयीत सळसळत होता..
(ही लघुकथा कालनिर्णय दिनदर्शिका आयोजित स्पर्धेसाठी लिहिली होती)
#धुळाक्षरे

No comments:
Post a Comment