Thursday, 26 May 2016

तगमग जगण्याची

जगण्याची एक तगमग,
ऊर फुटेपर्येंत धावण्याची,
बायको मुलांचा पसारा सावरण्याची,
भुकेल्या भिकाऱ्याला दोन रुपये नं देण्याची,
अपेक्षाभंग, दुटप्पीपणा पचवण्याची,
चेहरा हसरा ठेवण्याची, 
बोलताना साखरपेरणी करण्याची,
स्वतःची ओळख बनवण्याची,
अस्वस्थ फेऱ्या घालण्याची,
हात पाय थंड पाडून शून्यात पाहण्याची,
आपल्याबद्दल झालेले गैरसमज पचवण्याची,
ना पूर्ण स्वार्थी, ना पूर्ण परमार्थी असण्याची,
आत्म्याला मूल्ये चिकटवून घेण्याची,
या सगळ्याला काही अर्थ आहे याच्या खात्रीची,
लादले गेलेले बदल स्वीकारण्याची,
स्वतःचे असंख्य अपराध पोटात घालण्याची,
शेवटी मूठभर करडी माती होण्याची,
आयुष्य एक तगमग.