वांझोटे आकाश, घशाला कोरड
खडकांच्या अधेमधे माती, पण तीसुद्धा भरड
कष्टाच्या पिकांना फुटवा आशेचा अंकुर,
पण पावसाप्रमाणे विजेवरची मोटरही क्षणभंगूर
हाडा-हाडांची जनावरे, गवता-काड्यांची घरे,
फुटक्या कौलांखाली खेळणारे गरिबीचे वारे
गोधडीवर उद्याच्या काळजीने, बदलणारी कूस
सोबत खिशाला कुरताडणारी महागाईची घूस
कडक उन्हाखाली उमदा पोरगा राबून राबून खंगला,
ढेरपोट्या दलालाच्या घरावर चढला आणखी एक मजला
खता-बियाण्यांसाठी शेतावर सावकारी बोजा,
हिंदू असो वा मुस्लिम, शेतकऱ्यांना सक्तीचा कडक ऱोजा
पिकांच्या डोलण्यावर लावला वेळ, कष्ट, भांडवलाचा सट्टा, कोरड्या डोळ्यांच्या गोऱ्या ढगांनी लावला
भेगाळलेल्या काळ्या आईला वांझपणाचा बट्टा
मातकट हातपाय गळाले, अंधाराने डोळे दिपले
एका वेड्या विचाराने माणक्यातून
वरवर काही अभद्र थंडथंड सर्पटले
बांधावरील पिंपळाकडे वळले पाऊल,
बोटांचा गाठ बांधण्या-सोडण्याचा चाळा,
मनामध्ये जुन्यापुराण्या स्मृतींचा उमाळा
अशक्य गोष्टींचा हट्ट धरणारी छकुली,
चिंध्या पांघरून काटक्या गोळा करणारी बायको,
मानेवर जू रूतलेले सोशिक डोळ्यांचे बैल,
भडभडून आला हाताशतेने हुंदका,
दोरखंडाच्या टोकाला बसला सुटकेचा शेवटचा हिसका.